Samtaparv

बुद्धिमत्ता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकहिताचा संगम : डॉ. हर्षदीप कांबळे

सन 2005 पासून यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत असताना डॉ. हर्षदीप कांबळे यांनी कर्तव्यदक्ष, बुद्धिमान आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. गावोगावी जाऊन शेतकरी, आदिवासी व सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांनी समस्या समजून घेतल्या आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर गुंतागुंतीचे प्रश्न परिणामकारकपणे सोडवले.

शेतकरी आत्महत्या, अपुरी सिंचन व्यवस्था, शिक्षणातील अडचणी आणि मूलभूत सुविधांवर त्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रित केले. सिंचन प्रकल्पांना गती देत व्यवहार्य निर्णय घेतल्यामुळे विकासकामांना वेग मिळाला आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. पारदर्शक व संवेदनशील कार्यशैली, तक्रारींवर त्वरित कारवाई आणि सर्वसामान्यांना सहज भेटण्याची तयारी यामुळे प्रशासनाबद्दल लोकांचा विश्वास दृढ झाला. ‘समता पर्व’ चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधन घडवून प्रशासनाला मानवी चेहरा दिला. एकूणच, बुद्धिमत्ता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकहिताची जाणीव यांचा संगम असलेले डॉ. हर्षदीप कांबळे यांनी यवतमाळ जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थान निर्माण केले. 

समता पर्वाचे प्रेरणास्थान : डॉ. हर्षदीप कांबळे

      भारतीय प्रशासन सेवेतील महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांची कर्तव्यदक्ष, बुद्धिमान आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून वेगळी ओळख आहे. एफडीए आयुक्त असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात जाऊन हृदय स्टेंट व औषधांच्या किंमती कमी करण्याचे धाडसी काम त्यांनी केले. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे महापालिका आयुक्त म्हणून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणत स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू केली.
    इंडस्ट्री कमिशनर म्हणून तरुण उद्योजक घडावेत या उद्देशाने राज्याची नवीन ‘मुख्यमंत्री रोजगार योजना’ राबवली. कोविड काळात हजारो नागरिकांना मदत करण्यासाठी प्रभावी प्रशासन उभे केले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव म्हणून महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक आणली आणि त्यातील जवळपास ५०% गुंतवणूक नागपूर, विदर्भ आणि औरंगाबाद या भागात प्रथमच वळवली. दावोस, स्वित्झर्लंड येथेही राज्याचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले.

     सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख म्हणून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १०० नवीन वसतिगृहांची संकल्पना राबवली. केंद्र सरकारमध्ये कार्यरत असताना SC/ST उद्योजकांसाठी शासन खरेदीत आरक्षण, सफाई कर्मचाऱ्यांसाठी हाताने मैला साफ करण्याविरोधातील कायदेबदल, तसेच दिव्यांग अधिकारांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले. सनदी अधिकारी म्हणून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच अकोला येथे सन २००० मध्ये राज्यातील पहिले BOT तत्त्वावरील स्टेडियम उभारण्याचा पुढाकार त्यांनी घेतला. अशा अनेक मोठ्या प्रशासकीय निर्णयांमुळे सामाजिक जाण असलेले अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक निर्माण झाला असून महाराष्ट्रातील अनेक युवकांचे ते आदर्श आहेत.
    यवतमाळवासीयांशी त्यांची ओळख २००४ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यापासूनची आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाला नवा दृष्टिकोन दिला आणि मोलाची भर घातली. गावोगावी जाऊन शेतकरी, आदिवासी आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांनी समस्या समजून घेतल्या. शेतकरी आत्महत्या, अपुरी सिंचन व्यवस्था, शिक्षणातील अडचणी आणि मूलभूत सुविधांवर त्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रित केले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासमोर यवतमाळमध्ये केलेल्या सखोल सादरीकरणाच्या आधारे देशातील शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक पॅकेज मंजूर करण्यात आले. त्यांच्या कामामुळे प्रशासनाबद्दल लोकांचा विश्वास दृढ झाला.
     उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबरोबरच सर्व समाजाला जोडण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी ‘समता पर्व’ चळवळीच्या माध्यमातून केले. या उपक्रमातून सामाजिक प्रबोधन घडवून प्रशासनाला मानवी चेहरा मिळाला. बुद्धिमत्ता, कर्तव्यनिष्ठा आणि लोकहिताची जाणीव यांचा संगम असलेले डॉ. हर्षदीप कांबळे यांनी यवतमाळ जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन घडवून यवतमाळकरांच्या हृदयात आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून स्थान निर्माण केले. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर आधारित ‘समता पर्व’चे काम आजही त्यांच्या प्रेरणेने संपूर्ण जिल्ह्यात अविरत सुरू आहे.

कार्यक्रम स्थळ

७ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत समता मैदान, राजर्षी शाहू महाराज समता परिसर, यवतमाळ येथे “समता पर्व” मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

अधिक माहितीसाठी वर दिलेल्या बटणावर क्लिक करून कार्यक्रम स्थळाचा नकाशा व सविस्तर माहिती पहा.

यूट्यूब विडियो

सामाजिक माध्यमे

Scroll to Top